माझ्याकडचा मसाला टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार – नारायण राणे


माझ्याकडचा मसाला टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार – नारायण राणे

माझ्याकडचा मसाला टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार – नारायण राणे


रत्नागिरी : मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे. सगळेच एकदम सांगणार नाही. पण टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार आहे, असा धमकीवजा इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

गेल्या मंगळवारी घडलेल्या अटक-नाट्यामुळे स्थगित करावी लागलेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीत पूर्ण केली. यावेळी येथील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केले आहे. त्यामुळे यांची अनेक जुनी प्रकरणे मला माहीत आहेत.  सगळी प्रकरणे टप्प्याटप्प्याने बाहेर काढेन. तेव्हा  दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ  नका, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला.

महाविकास आघाडीचे सरकार येऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांत कोकणाला काय दिले, असा सवाल उपस्थित करत, आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामे करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंचे नाव न घेता टोमणा मारला.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या