स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान


 स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

नवी दिल्ली: १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा करणार आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात असंख्य देशवासियांची मान गौरवाने उंचावणाऱ्या ऑलिम्पिक पथकाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार होणार आहे.५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक संघाला लाल किल्ल्यावर प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत.यावेळी पंतप्रधान सर्व खेळाडूंसोबत संवाद साधतील. पंतप्रधानांच्या निवासस्थानी खेळाडूंसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.येथे पंतप्रधान टोकियो ऑलिम्पिक मधील खेळाडूंचे अनुभव ऐकणार आहेत.टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत आतापर्यंत भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन संमिश्र राहीले आहे. ११ व्या दिवसापर्यंत खेळाडूंनी केवळ दोन पदकांची कमाई केली आहे.वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना रौप्य तसेच बॅटमिंटन पटू पी. व्ही. सिंधूला कास्य पदक मिळाले आहे. तर, इतर बड्या खेळाडूंच्या हाती निराशा आली आहे.असे असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा संपूर्ण प्रयत्न करीत आहे. देशाला अजूनही काही पदके मिळण्याची आशा आहे.यंदा ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारताचे सर्वात मोठे १२७ खेळाडूंचे पथक पोहचले आहे.

........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments