शब्द लहरी
शब्द लहरी
निसर्ग
निसर्गात रमायला,फिरायला,त्याचा आस्वाद घ्यायला प्रत्येकालाच आवडते.सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे प्रत्येकालाच आवडते.पण रस्ते रुंदीकरणासाठी अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव कसे घेऊ शकाल.वडाच्या पारंब्याना लटकणे,चोरून आंबे पाडणे,मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने; या साऱ्या आठवणीनी आपले बालपण सजले होते.पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे,पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग आपणच तक्रार करतो की आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात.त्यांना निसर्गात फिरुद्या,त्याचे निरीक्षण,अभ्यास करू द्या.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
--------------------------------------------------------
आंनद
काल बऱ्यापैकी प्रत्येकाच्या स्टेटसला कुणी सावळ्या श्रीकृष्णाचं तर कुणी त्याच्या राधेचं मन मोहक रूप वस्रधारण केलेल्या लहान लहान मुलांना पाहिलं असेल.ते साजिरं गोजिरं रूप आपण पाहिल्याल्यानंतर जो आंनद अन मनाला एक सुंदर कौतुक वाटत गेलं तेचं सगळं प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टींमध्ये पाहत राहिलो तर प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण स्वतःला आनंदानं जगण्याची एक वेगळीच ऊर्जा देईल अन आनंदाची एक वेगळीच चाहूल मिळत राहील...फक्त याचं सातत्य आणि समाधान असणं आवश्यक आहे...
काव्यमय प्रवास
लेखन संकलन देवयानी गवळी
---------------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
तेथ सुदनांची द्युती । तेचि
विद्युलता झळकती । गंभीर वाचा
ते आयती । गर्जनेची ।।
आता तो उदार। कैसा वर्षेल ।
तेणे अर्जुना चळू निवेल । मग नवी
विरूढी फुटेल । उन्मेषाची ।।
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा ।
निव्रुत्तीदासू ।।
त्या श्री क्रुष्ण रूप मेघाचे ठिकाणी शुभ्र दातांची प्रभा हीच
कोणी एक वीज चमकत होती
व त्यांचे गंभीर भाषण हीच कोणी
एक मेघ गर्जना होती .
असा तो श्री भगवान रुप उदार
मेघ आता कशी व्रुष्टी करील ? आणि
त्या व्रुष्टी ने दुःखाने पेटलेला अर्जुन
रूप पर्वत कसा शांत होईल . आणि
त्याला ब्रह्मज्ञानाचा अंकुर कसा फुटेल?
अशी ती कथा शांत चित्ताने ऐका
असे निव्रुत्ती दास संत ज्ञानेश्वर महाराज
म्हणतात .
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक

Comments
Post a Comment