स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी शालेय वस्तूंचे वाटप

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी शालेय वस्तूंचे वाटप
राजापूर: मु. पो. देवाचे गोठणे राऊत वाडी तालुका- राजापूर, जिल्हा- रत्नागिरी.. दिनांक १५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राऊत वाडीतील बालवाडी, इयत्ता १ली ते इयत्ता १०वी शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच ११वी व १२वी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्यानिमित्त मुलांना मार्गदर्शन कार्यक्रम कोरोनाचे(कोविड) चे नियम पाळून गावाला वाडीतील स्थानिक शालेय मुलांसाठी आयोजित केला होता.
तरी आपल्या राऊत वाडीतील ग्रामस्थ मंडळींच्या अतिशय चांगल्या सहकार्यामुळे आणि चांगल्या प्रतिसादामुळे आनंदात यशस्वीपणे पार पडला त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद अशीच साथ व सर्वांचे सहकार्य ,प्रेम माझ्या पाठीशी कायम राहू देत तसेच आपल्या वाडीत अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम यापुढेही कायम होऊ देत हीच श्री राऊत वाडी महापुरुषा चरणी प्रार्थना करतो.- श्री. हितेश परशुराम राऊत
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment