महापूर, अतिवृष्टी, दरड कोसळल्यामुळे चारशे कोटीचा फटका


 
महापूर, अतिवृष्टी, दरड कोसळल्यामुळे चारशे कोटीचा फटका

रत्नागिरी :- ढगफुटीसारख्या पावसामुळे चिपळूण, खेड, संगमेश्‍वर आणि राजापूर तालुक्याला फटका बसला. यामुळे जिल्ह्यातील २४ हजार मालमत्तांचे सुमारे चारशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. खेड, चिपळूणमधील सुमारे २४ हजार मालमत्तांना फटका बसल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ९० टक्के पंचनामे केले आहेत. घरे, दुकानां बरोबरच दरडी कोसळून, रस्त्यांना भेगा पडल्याने शासकीय मालमत्तेचेही नुकसान झालेले आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटलेला आहे. रस्ते, पूल, साकव वाहून गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे सुमारे ८० कोटीचे नुकसान झाले आहे. भातशेती वाहून गेल्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्याचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. खासगी, सार्वजनिक मालमत्तांसह, कृषी व पशूंचे मिळून चारशे कोटींच्यावर नुकसानीचा आकडा पोचल्याचा अंदाज वर्तविला आहे.

--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या