प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांचे उन्नयन योजना
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांचे उन्नयन योजना
रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी यांचे जनतेला लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
देशामधील असंघटीत अन्नप्रक्रीया क्षेत्रामध्ये या उद्योगासाठी सर्वंकश मुल्यसाखळीच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण, उद्यमशिलता, तंत्रज्ञान, कर्ज व विपणन या बाबतीत शासनाचा सक्रीय सहभाग व पाठबळाची गरज आहे. त्या अनुषगाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगाचे उन्नयन योजना ही केन्द्र पुरस्कृत योजना सुक्ष्म खारा उद्योजकांसाठी तयार केली आहे. उद्योजकाची क्षमता विचारात घेवुन त्याना सहाय्य करुन औपचारीक दर्जा प्रदान करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्नप्रक्रीया उद्योगाना पतमर्यादा उपलब्ध करुन देणे, उत्पादनाचे विपणन अधिक बळकट करणे हे या योजनेचा मुळ उद्देश आहे. यामध्ये अन्नप्रक्रीया उद्योगाना बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य देय राहील या योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण स्विकारले असुन रत्नागिरी जिल्हयाकरीता आंबा पिकाची निवड केली आहे. या योजनेचा लाभ वैयक्तीक प्रक्रीयाधारक, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक सस्था घेवु शकतात, सध्या कार्यरत असलेल्या वैयक्तीक सुक्ष्म उद्योगाना गुंतवणुकीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. परंतु कार्यरत उद्योग जर अन्य उत्पादन घेत असतील तर त्याना देखील या योजनेतर्गत सहाय्य केले जाणार आहे. सहायता गट किंवा शेतकरी उत्पादक संस्था व सहकारी संस्थाच्या बाबतीत मात्र जे एक जिल्हा एक उत्पादन हया धोरणानुसार आंबा प्रक्रीया उद्योग करत असतील तरच त्यांच्या सहाय्यासाठी विचार केला जाईल. परंतु या संस्था जर अन्य उत्पादनांवर प्रक्रीया करीत असतील व त्यांच्याकडे पुरेसे तांत्रिक आर्थिक व उद्यमशील पाठबळ असेल तर सहाय्य करता येईल, नविन उद्योगाच्या बाबतीत वैयक्तीक प्रक्रीयाधारक शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक संस्था सुरु करत असतील तर एक जिल्हा एक उत्पादन हया धोरणानुसार आंबा प्रक्रीया उद्योगांसाठीच सहाय्य केले जाईल. प्रकल्प किंमतीच्या 35 टक्केपर्यंत व जास्तीत जास्त रु. 10.00 लाख या मर्यादित प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय राहील. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के व उर्वरीत बँक कर्ज असेल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. प्रक्रीयादार स्वत:ही ऑनलाईन अर्ज http pmfime.mofpi.gov.in या सकेतस्थळावर करु शकतात. ऑनलाईन अर्ज करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तीची ( Disinct Resource Person ) निवड करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छीणा-या प्रकल्प धारकांनी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी यांच्याशी सपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी तालुका कृषी अधिका-यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा