रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसची शहर युवक कार्यकारणी जाहीर


रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसची शहर युवक कार्यकारणी जाहीर


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेशासाठी युवकांचा वाढता ओढा दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुमार शेट्ये, राजाभाऊ लिमये, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, पक्ष प्रतोद सुदेश मयेकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हासरचिटणीस बबलू कोतवडेकर, शहर अध्यक्ष निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड.बंटी वणजू आणि रत्नागिरी राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, नागेश जागुष्ट्ये यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रवण तकेल, अक्षय मजगावकर, पुष्पक रसाळ, सुफियान वस्ता, आयमन भाटकर, नूर वस्ता, शुभम धामणसकर, मिथिलेश पाटिल  आदी युवकांना नियुक्ती पत्र युवक पक्ष निरीक्षक निखिल शिंदे यांच्याकडून देण्यात आली. या प्रसंगी अनेक युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्या वेळी रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहर अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष नागेश जागुष्ट्ये, उपाध्यक्ष रवी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पु तोडणकर, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संकेत कदम, विद्यार्थी शहर अध्यक्ष साईजीत शिवलकर, ओमकार शेट्ये, संजीत गांधी, नचिकेत पोटफोडे, राजेश कृष्णा अलीम,सुरज जाधव समीर कुडची, दत्तात्रय निकम, सागर इंगोले, अथर्व साळुंखे, महेश गायकवाडआदी उपस्थित होते.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या