दिनांक १ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरजोळेत धडक कारवाई
https://youtu.be/IdMXCN7Zbew
दिनांक १ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरजोळेत धडक कारवाई
आरोपी पसार का झाले?
रत्नागिरी:-मिरजोळे ता.जि.रत्नागिरी येथे गावठी दारू तयार करणा-या हातभट्टयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून रू. ५७,७०० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निमुर्लन मोहिमे अंतर्गत आयुक्त कांतीलाल उमाप यांचे निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हयात विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. अधीक्षक व्ही.व्ही. वैदय यांनी हातभट्टी निमुर्लन मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत मिरजोळे ता.जि.रत्नागिरी येथे हातभट्टी सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी शहर, लांजा व रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व इतर मुद्देमाल असा मिळून ५७,७०० /-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी गावठि दारू निर्मीतीसाठी लागणारे जवळपास २६०० लिटर रसायन आढळून आले. कारवाईसाठी जिल्हयातील पथक येताच आरोपी पसार झाले. त्यामुळे आरोपी का पसार झाले हा प्रश्न आता उपस्थीत होऊ लागला आहे. त्यामुळे घटनास्थळी कोणताही इसम आढळून आला नाही. आरोपींचा तपास सुरू आहे. वरील कारवाई प्र.अधीक्षक व्हि. व्हि. वैदय यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक श्री.दि. एस मोरे, पी.एल. पालकर, दुय्यम निरीक्षक ए.ए. पाडाळकर, एस. ए.भगत, स. दु. निरीक्षक दि. पी. हातिसकर, जवान व्हि.आर. सोनावले, एम. एस. पवार, ओंकार कांबळे, विटकर व महिला जवान श्रीमती ए. एन. नागरगोजे यांनी केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्हयातील लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतुक व विक्री होवू नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्र.अधीक्षक व्हि. व्हि.वैदय यांनी सांगितले .
--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment