Skip to main content
रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ.धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले
रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ.धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले
रत्नागिरी:-रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ.धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले. याचा नामकरण सोहळा रविवार दिनांक १ ऑगस्ट रोजी पार पडला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना उदय सामंत उपस्थित होते. रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपपरिसराला पद्मभूषण स्व.डॉ.धनंजय कीर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागिल काही महिने जोर धरु लागली होती. आज या मागणीचे सत्यात रुपांतर झाले आहे. याच वेळी विद्यापीठात लोकमान्य टिळक अध्यासन केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी लोकमान्य टिळक चरित्र साधना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच एम.एस.सी. परिक्षेत चांगले यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना झाड देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ.बळीराम गायकवाड, डॉ.सुमीत कीर, डॉ.किशोर सुखटणकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, ज्येष्ठ लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ.सुचित्रा नाईक, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment