सातारा अपघात ओढ्यात कार कोसळून कोल्हापूरचे दोघे ठार

 




सातारा अपघात ओढ्यात कार कोसळून कोल्हापूरचे दोघे ठार

सातारा:  येथे कार चालकाचा ताबा सुटून गाडी ३० फूट खोल ओढ्यात गेली. यामध्ये कोल्हापूरचे दोघे ठार झाले. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयानजीक असलेल्या ओढ्यात ही गाडी गेली.भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला. गाडी साधारणपणे ३० फूट खोल पडली. या घटनेत दोघे जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मृत झालेले दोघे कोल्हापूरचे 

अपघातात मृत झालेले दोघे कोल्हापूरचे असल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळी पोलिसांनी आणि रिक्षा चालकांनी धाव घेतली. आणि ओढ्यात जाऊन शोध घेत त्यांना बाहेर काढले.पोवई नाक्याहून कोरेगावच्या दिशेने ही भरधाव कार जात होती. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

.......................................
------------------------------



Comments