भाजप कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या

 

श्वानाच्या मृत्यूच्या तपासातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त


भाजप कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी दोन दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्याचा जागीच मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरच्या ब्राझलू जागीर भागात ही घटना घडली. जावीद अहमद दार असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो भारतीय जनता पक्षाशी संबंधित होता. तो सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याच्या निवासस्थानाजवळ उभा असताना दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments