आई फाऊंडेशन कडून चिपळूण मधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात



आई फाऊंडेशन कडून चिपळूण मधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात 


आई फाऊंडेशन या रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या सामाजिक संस्थेच्या वतीने चिपळूण येथील १२५  पुरग्रस्त कुटुंबियांना संस्थेच्या वतीने मूलभूत व जिवनावश्यक  वस्तूंचे वाटप करण्यात आले.चिपळूण मधील जाडेआळी (पेठमाप), महाराष्र्ट हायस्कूल शेजारी रामोशीवाडी आणि कुंभारवाडी, खेंड-भालेकर सोसायटी, वडनाका,वाणीआळी, देसाई एनक्लेव्ह सोसायटी या ठिकाणच्या पुरग्रस्तांना आई फाऊंडेशनच्या माध्यमातून मूलभूत व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्षा अवंतिका शिरोळकर तसेच शर्मिला महाकाळ यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला तर गणेश मित्रमंडळ पेठमापचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी आई फाऊंडेशन कडून घेतलेल्या जाणार्‍या परिश्रमांची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी आई फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा अवंतिका शिरोळकर, संस्थेच्या लिपीक शर्मिला महाकाळ,व्यवस्थापिका श्रावणी मानके,उमेश मानके,थेरपीस्ट विशाल निकम,अंकित शिरोळकर,दिलीप कदम,अजित जाधव, गणेश मित्रमंडळ पेठमापचे अध्यक्ष शशिकांत  पवार,रविंद्र जड्याळ, निलेश रमाणे तसेच आई फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments