महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणारा भंडारा पहिला जिल्हा

 


 महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणारा भंडारा पहिला जिल्हा

 भंडारा : भंडारा जिल्हा अखेर कोरोना मुक्त झाला आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण हा 24 एप्रिल रोजी आढळला होता, त्यांनतर तर जिल्ह्यात विदारक चित्र पाहावयास मिळाले. ऑक्सिजन तुटवडा असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर शेवटचा रुग्ण हा 23 जुलै रोजी आढळून आला होता व शेवटचा रुग्ण आज कोरोना मुक्त झाला असून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. आज घडीला जिल्ह्यात शून्य कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 59809 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते, तर 1133 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भंडारा जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत जिल्हाभर उपाययोजना राबविल्या होत्या तसेच जे नागरिक कोरोना बाधित आढळले त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन करत उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे आज भंडारा जिल्हा महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणारा पहिला जिल्हा ठरला आहे.

........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments