पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन




  पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन


पुणे : पुण्यात व्यापारी महासंघाने जागोजागी आज घंटानाद आंदोलनाला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून शहरातील दुकानांची वेळ वाढून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी यातून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी आज दुपारी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या