रत्नागिरीत अतिवृष्टी व पूरस्थिती मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष प्रत्येकी 1 लाखाचे वाटप सुरु

रत्नागिरीत अतिवृष्टी व पूरस्थिती मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष प्रत्येकी 1 लाखाचे वाटप सुरु


रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्हयातील अतिवृष्टीत मरण पावलेल्या मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे अतिरिक्त मदतीचे वाटप आज सुरु झाले. यातून खेड तालुक्यातील 18, चिपळूण मधील 11, राजापूर मधील 2 आणि संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक एका मृताच्या वारसाला ही मदत दिली जाणार आहे.
      जिल्हयात 68 मदत छावण्या कार्यरत आहेत. आपत्तीत बाधित गावामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे मोफत गहू आणि तांदुळ पुरवठा करण्यात येत असून  आजपर्यंत 189 गावातील 5335 कुटुंबांना 533.50 क्विंटल गहू आणि 533.50क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.
      विभागातफे जिल्हयातील बाधित 56 गावातील 1449 कुटुंबाना आजपर्यंत 7245 लिटर केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.
      बाधितांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. यात ऑनलाईन पध्दतीने आजर्यंत 45019 व ऑफलाईन पध्दतीने 2914 अशा एकूण 47,933 शिवभोजन थाळींचे वाटप झालेले आहे.
तात्पुरते पुनर्वसन
      22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील मौजे पोसरेखुर्द येथील दरड कोसळून पूर्णत: जमीनदोस्त झालेली 8 कुटूंबे व पोसरे बुद्रुक येथील एक कुटूंब अशी एकूण 9 कुटूंबे तसेच पुन्हा भूस्खलनाचा धोका असल्याने सदर ठिकाणी असलेली 12 कुटूंबे व चिपळूण तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथील दरड कोसळून पूर्णत: क्षतीग्रस्त झालेली 5 कुटूंब अशा एकूण 26 कुटूंबाचे तात्पुरते पुनर्वसन चिपळूण तालुक्यातील मौजे अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीमधील रिक्त निवासस्थानात करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली.  जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी येथे भेट देवून येथे असणाऱ्या सुविधांबाबत स्थलांतरितांशी चर्चा केली.  त्यासोबत अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे देखील होते.  
कायमस्वरुपी पुनर्वसन
      खेड तालुक्यातील मौजे पोसरेखुर्द येथील बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी कायमस्वरुपी सुरक्षित अशी शासकीय/खाजगी जागा निश्चित करुन जागेचे मागणीसह पुनर्वसन प्रस्ताव आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबत उपविभागीय अधिकारी खेड व तहसिलदार खेड यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments