रत्नागिरीतील कलाकारांनी साकारला "Towards Healthy Life Style" हा लघुपट
रत्नागिरीतील कलाकारांनी साकारला "Towards Healthy Life Style" हा लघुपट
रत्नागिरी : कोरोना काळात आपल्या कुटुंबीयांची कशी काळजी घ्यावी यावर आधारित रत्नागिरीतील हौशी कलाकारांनी "Towards Healthy Life Style" हा लघुपट बनवला आहे. या लघुपटाची कथा सिद्धेश खटावकर यांची असुन पटकथा आणि संवाद नकुल नाडकर्णी यांचे आहे. याचे संकलन आणि दिग्दर्शन शुभम मुसळे आणि छायांकन निरामय साळवी यांनी केले आहे. या लघुपटात कलाकार म्हणुन रत्नागिरीतील प्रसिद्ध नाट्यकर्मी भाग्येश खरे, गोपाळ जोशी, अलका बेंदरकर, नकुल नाडकर्णी, रीचा मुळये यांनी भुमिका साकारल्या आहेत. हा लघुपट कोरोना महामारीविरोधात लढणारे महाराष्ट्र पोलीस यांना समर्पित केला आहे. लघुपटासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले, प्राध्यापक वैभव कानेटकर, दीपक माणगावकर, स्वप्नील राणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बांधकाम व्यावसायिक मुकुंद जोशी आणि कुटुंबिय, संगीतकार मिलिंद गोवेकर, गंधर्वी नाडकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
Comments
Post a Comment