… तर Lockdown पुन्हा जाहीर करा, मोदी सरकारचा राज्यांना इशारा




 … तर Lockdown पुन्हा जाहीर करा, मोदी सरकारचा राज्यांना इशारा


कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना देशातील अनेक राज्यांत सध्या निर्बंध  शिथील होत असल्याचं चित्र आहे. मात्र या सवलतीचा अनेक नागरिक गैरफायदा घेत असल्याचं चित्र असून कोरोना नियमांचं उल्लंघन होण्याच्या  घटनांमध्ये वाढ होत आहे.यापुढं ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचं उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिला आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक पर्यटक घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. विशेषतः देशभरात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असून मास्क न घालता आणि सोशल डिस्टन्सिंगचं (social distance) पालन न करता पर्यटक जागोजागी गर्दी करत असल्याचं चित्र आहे.काही राज्यांमध्ये बाजारपेठा, दुकानं आणि मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडत असल्याचं चित्र असून या गोष्टी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments