सेक्स रॅकेट प्रकरण: रॅकेट चालविणारा कोठडीत; पत्नी फरार
सेक्स रॅकेट प्रकरण: रॅकेट चालविणारा कोठडीत; पत्नी फरार
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गुरुवारी आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. रॅकेट चालवणाऱ्या दाम्पत्यापैकी पतीला शुक्रवारी न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून फरार पत्नीचा शोध सुरू आहे. दरम्यान, यातील पीडितेला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या अनैतिक व्यवसायाची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाल्यावर पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सदाशिव वाघमारे शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठविले. यावेळी मुलींना बेकायदेशीररीत्या आणून व गि-हाईक आणून अनैतिक व्यवसाय सुरू आहे, याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तिथे एक पीडित मुलगी व तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारा संशयित असे दोघेजण आढळले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव रावसाहेब जगन्नाथ माळी (४२ वर्षे, रा. भेकराईनगर, बसस्टॉप शेजारी, ता. हवेली. जि. पुणे-मळ रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याने सांगितले. तो पूर्वी एसटीमध्ये चालक म्हणून नोकरीला असताना त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने ती नोकरी सोडली. त्या नंतर उदरनिर्वाह करण्यासाठी आपण पत्नी स्वतच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गि-हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहितीही पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी रावसाहेब माळी व त्याची एक स्त्री साथीदार यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करुन दाखल करुन यातील रावसाहेब माळी यास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment