रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण थांबले...
रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण थांबले...
22 जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण बंद तत्काळ लस उपलब्ध करून दिलासा द्यावा- अनिकेत पटवर्धन यांची मागणी
जिल्ह्यात लसीकरण २२ जुलैपासून थांबले आहे. अतिवृष्टी, पूर आणि महामार्ग बंद असल्याने लस आली नाही, असे कारण सांगितले जात आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे व वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त असताना लस मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. नवे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. याबाबत राज्य सरकारकडे तक्रार देऊ, जिल्ह्यात पूरस्थिती आहे, मात्र उर्वरित भागात लस मिळणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
लसीकरणासंदर्भात जिल्हा परिषद किंवा जिल्हा आरोग्य विभाग कोणत्याही सूचना, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी माहिती जाहीर करत नाहीयेत. आम्ही मागणी करूनही लसीकरणाविषयी सर्वपक्षिय बैठक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. केंद्र किंवा राज्य सरकारकडून लसीकरण थांबवण्याबाबत कोणतीही सूचना नसताना आता लसीकरण का थांबवले आहे याचा खुलासा करावा. तक्रार कराची लागेल. खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.मात्र उर्वरित तालुक्यात किंवा शहरातील भागात पुरेशी लस का उपलब्ध झाली नाही? , सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.
प्रशासनाकडे माहिती घेतली असता कोल्हापूर मार्ग बंद असल्याने लससाठा येऊ शकला नाही. परंतु राज्य सरकारच्या मार्फत मदत घेऊन लसीकरणासाठी साठा उपलब्ध होऊ शकला असता.
सध्या कोरोनाच्या संकटात लस हा एकमेव उपाय असून कोरोना विषयक नियम पाळणे आवश्यक आहे. लस साठा उपलब्ध करून देण्यात दिरंगाई करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.पालकमंत्री यांनी आदेश काढला आहे का?, आरोग्य विभागाने दखल घ्यावी, जिल्हा मोठं आहे, 22 जुलै पासून लसीकरण झालेले नाही. त्याबाबत नाकर्त्या मंत्र्यांनी उत्तर द्यावे. अनेकांचे पहिली लस घेऊन दिवस पूर्ण झाले आहेत व त्यांना आता लस मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यांना त्वरित लस मिळाली नाही तर काय होईल, याचा विचार जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने केला आहे काय असा सवालही अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.

--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment