रत्नागिरीमध्ये उभारणार दुसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा



 रत्नागिरीमध्ये उभारणार दुसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा 


रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता, कोरोना चाचणी वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकच कोरोना चाचणी प्रयोगशाळा आहे. त्याची क्षमताही दीड ते दोन हजार असून, २४ तास ती मशीन सुरु असते.जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये सध्याच्या घडीला दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या होतात, परंतु, मधल्या काळामध्ये साडेतीन ते चार हजार नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता. मशीनवर जास्त प्रमाणात लोड असल्याने अहवाल मिळायला विलंब लागत होता. परंतु, आत्ता त्यामध्ये अहवाल २-३ दिवसामध्ये मिळणे शक्य झाले आहे. पण तपासणीसाठी येणारा रुग्ण अहवाल मिळेपर्यंत अनेक ठिकाणी वावरून आलेला असल्याने कोरोना स्प्रेडरचे काम असे रुग्ण करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांचे अहवाल वेळेवर मिळणे गरजेचे असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये  दुसरी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी दिली आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments