हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री…!





  हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री…!


 संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली, चिपळूणचा धावता दौरा करून पालकमंत्री मुंबईला रवाना


 रत्नागिरी : आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात… अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!!, अशी टीका चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.

 मंत्री परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली

कोकणात पावसाने अक्षरश: हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत… अशावेळी पालकमंत्र्यानी तिथे थांबून जनतेला धीर देणे अपेक्षित होते. मंत्री परब यांनी संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.


 चिपळूण दौरा करून पालकमंत्री मुंबईला रवाना

कधीतरी रत्नागिरीत येणारे पालकमंत्री अनिल परब यांनी हा दौरा देखील धावता केला. गुरुवारी दुपारनंतर पालकमंत्री चिपळूणात पोहचले व केवळ वरवर आढावा घेत त्यांनी रात्रीच सिधुदुर्ग गाठत दुसऱ्या दिवशी गोव्यावरून मुंबई गाठली. पुरात बुडणाऱ्या जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडून पालकमंत्र्यांनी मुंबई गाठल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


 ना. उदय सामंत, खा. विनायक राउत तळ ठोकून चिपळूणात

चिपळूणकरांना वाऱ्यावर सोडून पालकमंत्री गेले तरी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व खा. विनायक राऊत हे मात्र तळ ठोकून चिपळूणात होते. नागरिकांना वाचवण्यासाठी रेस्कू ऑपरेशन ते नागरिकांची जेवणाची व्यवस्था आदी सर्व गोष्टींची पूर्तता तातडीने कशी होईल यासाठी मंत्री उदय सामंत आणि खा. विनायक राउत हे प्रयत्न करताना दिसत होते.



..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments