राज्यात शाळा सुरु करु नयेत….




 राज्यात शाळा सुरु करु नयेत….


महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र राज्यावरील कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात 8 ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याचा विचार करत आहे.मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सरकारमध्ये शाळा  सुरु कराव्यात की नाही यावर चर्चा सुरु आहे. मात्र यावर राजेश टोपे अनुकूल नसल्याचं समजतंय. सध्या तरी राज्यात शाळासुरु करु नयेत, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.राजेश टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे कॉलेज सुरु करण्यास काही हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाच्या प्रार्दुभावाचा धोका अधिक असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे कॉलेज (college) सुरु करण्यास हरकत नसल्याचंही ते म्हणालेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org