जनतेचा संयम सुटण्या अगोदर खुर्च्या सोडून मैदानात या.... रमजान गोलंदाज
जनतेचा संयम सुटण्या अगोदर खुर्च्या सोडून मैदानात या.... रमजान गोलंदाज
◼️ पूरग्रस्त पाण्यात आणि अधिकारी एसीत
◼️ तीन दिवस उलटले संगमेश्वर व रत्नागिरी खाडी पट्ट्यात कोणीच फिरकले नाही
◼️ तहसीलदार आणि प्रांत करतात तरी काय?
◼️ पूरग्रास्ताचे चुकीचे कागद रंगवून शासनाची फसवणूक केली
◼️ लवकरच मुख्यमंत्री व आयुक्त यांच्या कडे तक्रार करणार
संगमेश्वर:-रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे आणि धरणाचे पाणी कोणतीही कल्पना न देता सोडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणी घरच्या उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. अनेक लोकांना जीवितहानी आणि मानसिक त्रास त्यांना सहन करावे लागत असून याठिकाणी प्रशासनाचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चिपळूण प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र आजचा तिसरा दिवस उलटून सुद्धा तालुक्यातील उक्षी आणि अजून भागांमध्ये कोणत्याही प्रकारची मदत प्रशासनाने पोहोचली नाही त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील आंबेड सोनगिरी, कुरधुंडा कोळंबे, परचुरी, फुणगुस,शास्त्रीपूल, कसबा, फणसवणे अशा अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र त्या लोकांची कोणती विचारपूस प्रशासनाकडून करण्यात न आल्याने त्यामुळे आता तीव्र संताप व्यक्त केला जात असून जनतेच्या संयम सुटला अगोदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मैदानात येऊन लोकांना मदत करावी असे आवाहन रमजान गोलंदाज त्यांनी केले आहे.अधिकारी वर्गाकडून केलेल्या दिरंगाई मुळे लोकांना त्रास होत आहे.त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि कोकण आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे रमजान गोलंदाज त्यांनी सांगितले. कार्यालयामध्ये बसून कागद रंगून खोटे रिपोर्ट तयार केले असल्याचे काही कागद रमजान गोलंदाज यांच्या हाती लागले असून त्यावर आक्षेप घेत त्याच्या वरती तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.लोकं पूर परिस्थिती मध्ये पाण्यात आहेत मात्र तीन ते चार दिवस उलटून गेले तरी सुद्धा त्या त्या भागाचे तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी सर्कल किंवा प्रांत अधिकारी हे या पूरपरिस्थिती भागात फिरकले सुद्धा नाहीत चिपळूणमध्ये भयभीत अवस्था असताना रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांचा समावेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.बी एन पाटील हे सर्व वरिष्ठ मंडळी चिपळूणमध्ये आहेत. ते त्या ठिकाणी लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून मदत करण्याचं काम चालू आहे मात्र रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील असणारे अधिकारी यांच्या आहेत कुठे असा सवाल आता विचारला जात आहे. या ठिकाणी असणाऱ्या लोकांची कुठे कुठे पाहणी झाली त्यांना किती मदत प्रशासनाने पुरवली किंवा साधी विचारपूस सुद्धा न केल्याने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करत त्यांचा निषेध केला जात आहे. पूर परिस्थिती मध्ये असणाऱ्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरी येतात या ठिकाणी लोकांची विचारपूस करत नाही त्यांना भेटत नाहीत किंवा त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. पूर परिस्थिती मध्ये लोकांना मदत न मिळाल्यामुळे प्रशासनाचा विरोधात नाराजी आहेत.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment