राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी
राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी
महाराष्ट्र:-राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत (Delhi) दाखल झाले होते. दिल्लीत पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली. येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी अधिक सखोल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांत गैरव्यवहार झाल्याचं सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं.त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment