जानशी गावातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे धिंडवडे :-सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ लेखक राजा पटवर्धन यांची प्रतिक्रिया






जानशी गावातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे धिंडवडे :-सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ लेखक राजा पटवर्धन यांची प्रतिक्रिया


राजापूर:-६७ वर्षांच्या रघुनाथ राम धनावडे यांचा सर्पदंशाने २८ जुलै(२०२१)रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.कुमार वयातच चौथी पर्यंतचे शिक्षण करुन पुढील ४० वर्षे मुंबईत असंघटित क्षेत्रात काम करुन पुन्हा गावी येऊन स्थायिक झालेले रघुनाथ धनावडे व त्यांची पत्नी रोजंदारी करुन आपला उदरनिर्वाह करीत होते.थोडीफार भातशेती व सड्यावरची थोडी नाचणीची जमीन.२८ जुलैला सर्व धनावडे वाडीच नाचणीच्या शेतात काम करण्यासाठी सड्यावर गेली होती.रघुनाथही त्यांच्यातला एक.लघुशंकेसाठी थोडा आड गेला असता चुकून त्याचा पाय एका विषारी सापावर पडला.दंश फार जोराचा होता.गावातले काही तरुण दुचाक्या घेऊनच सड्यावर गेले होते.रघुनाथने सर्प स्वतःच पाहिला असल्याने गांभीर्य लक्षात आले होते.तरुणांनी दहा मिनिटात मोटर सायकलवरून जैतापूर चे आरोग्य केंद्र गाठले.नशिबाने डाॅ.साबळे(MBBS)तिथे हजर होते.त्यांचे सहकारी श्री.तावडेही.फारसा वेळ न जाता रघुनाथला सलाईन सुरू केले.विषदंशावरच्या इंजेक्शनचा पूर्ण डोस देण्यापूर्वी एक परिक्षा डोस(test) दिला गेला.दुर्दैवाने त्याची रिअॅक्शन आली.ही गंभीर घटना होती.डाॅ.साबळे यांनी अधिक वेळ न दवडता रुग्णाला रत्नागिरीला हलवण्याचा सल्ला दिला.कारण जैतापूच्या आरोग्यकेंद्रात रिअॅक्शन आल्यावर जी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते त्याला पुरेशी यंत्रसामुग्री व प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळही नाही.वाडीतले तरुण शिक्षित  धीराचे होते.त्यानी खाजगीअॅंबुलन्सची व्यवस्था केली.जैतापूरला अर्धातासही गेला नाही.रुग्ण ग्लानीतच होता.आजकाल अनेक तरुण उत्तम ड्रायव्हिंग करु शकतात.मोटीरही मदतीला होती.दुर्दैवाने रत्नागिरी गाठण्यापूर्वीच पावसजवळ रघुनाथ धनावडेचा मृत्यू झाला.ही वेळ सुमारे सायंकाळी  सहाची.त्यानंतर हाॅस्पटलची सर्व आवश्यक कारवाई.कागदपत्रे ,दाखले ,सहीशिक्के जमवून मृतदेह ताब्यात घेऊन गावकरीरत्नागिरीहून  जानशीत परत आले.सर्पदंशानंतर सुमारे वीस तास उलटले होते.सर्पदंशावरचे इंजेक्शन आरोग्यकेंद्रात उपलब्ध असूनही ,रुग्ण वेळेत आणूनही,मृत्यू टाळता आला नाही.का? तर इंजेक्शनची रिअॅक्शन आली तर पुढील उपचार करण्याची सुविधाच नाही.यंत्रसामुग्री नाही व पुरेसा प्रशिक्षित तज्ज्ञ आरोग्य कर्मचारी सेवकवर्ग नाही.याचा अर्थ असा होतो की आरोग्य केंद्रे या केवळ जुजबी सेवेच्या इमारतीआहेत!

जानशी चे उप- आरोग्य केंद्र

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

जेमतेम ३५० -६०वस्तीचे जानशीगाव.तिथे ग्रामपंचायत,अंगणवाडी,आरोग्य केंद्र(उप)अशा उत्तम इमारती आहेत.आज या आरोग्य केंद्रात फक्त एक सेविका आहे.कुणाला खरचटलं,काटा बोचला,बारिक सारिक  सर्दी ताप आला तर प्रथमोपचार मिळू शकतो.खरंम्हणजे इतपत ज्ञान आता सर्वांना आहे.इतके मामुली औषधोपचार असणाऱ्या केंद्रालाही अठरा गावे जोडलेली आहेत.करोना कालखंडात ही अपुरी आरोग्यव्यवस्था सुद्धा ताणली गेली आहे.परिसरातील सर्व संबंधित ग्रामपंचायतीनी या आरोग्य दुर्व्यवस्थेबद्दल  अधिक परिणामकारक  आवाज उठवायला हवा.हगणदारीमुक्त गाव असा फलक जानशीच्या आरोग्यकेंद्राजवळच आहे.एका कुटुंबाला शौचालय नाही याकडे आम्ही गेल्यावर्षी संबंधितांचे लक्ष्य वेधले होते.ते शौचालय त्या कुटुंबाच्या घराजवळ आज पर्यंत मिळालेले नाही.सर्पदंशाने एका शेतकरी-मजुराचा मृत्यूहोतो तोही गावात उपकेंद्र व पाचमैलावर आरोग्य केंद्र असताना ! यालाच आरोग्याचे धिंडवडे म्हणतात.रघुनाथ धनावडेंच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णाला सर्वप्रकारची शासकीय मदत मिळेल अशी आशा करुया.

राजापटवर्धन 09820071975



--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या