पुढील चार दिवस काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा




 पुढील चार दिवस काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई - मुंबई हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.भारतीय हवामान विभागाने रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.पुढील तीनही दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा तर पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.पुढील तीनही दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा तर पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी (13 जुलै) परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.


बुधवारी (14 जुलै) जालना परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments