उन्हवरेत घरे, दुकाने पाण्याखाली



 उन्हवरेत घरे, दुकाने पाण्याखाली


 दापोली : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचा दणका सुरूच आहे. तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून रविवारी रात्री काही ठिकाणचे ग्रामीण भागातील मार्ग बंद झाले होते. तालुक्यातील कोडजाई, दाभिळखाडी, उन्हवरे खाडी तसेच तालुक्यातील लहान मोठ्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तालुक्यातील उन्हवरे, वावघर या गावात खाडीचे पाणी वस्तीत शिरले. या वेळी येथील नागरिकांनी आपल्या घरातील किंमती वस्तू व अन्य साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा जोर इतका होता की, बघता बघता मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीत शिरल्याने फ्रिज, टीव्ही, सोपा, साहित्याचे नुकसान झाले आणि काही महत्वाची कागदपत्र देखील या पुरात वाहून गेली आहेत. येथील दुकान व्यावसायिकांचे देखील लाखोंचे नुकसान झाले आहे. येथील हॉटेल व्यवसायीक यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  मात्र पुराचे पाणी दिवसा वस्तीत शिरल्यामुळे यात जीवितहानी झाली नाही.  


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments