पाचल परिसरात मुसळधार, अर्जुना धरणाच्या कालवा वाहून गेला
पाचल परिसरात मुसळधार, अर्जुना धरणाच्या कालवा वाहून गेला
राजापूर : गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाचल परिसराला झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे-पाचल येथील अर्जुना नदीला मोठा पूर आला असून परिसरातील मोऱ्या व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. दरम्यान पावसामुळे अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्याचा काही भाग वाहून गेला आहे. पाचल परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पाचल नारकरवाडी येथील मोरी पाण्याखाली गेली असल्याने येथील रहदारी व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पाचल-जवळेथर रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. नदी काठावरची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाचल बाजारपेठेत नाल्याचे पाणी दुकानात शिरल्याने काही व्यापाऱ्यांचेही मोठे नुकासन झाले आहे. मात्र, सुदैवाने कोठेही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या अतिवृष्टीत अर्जुना धरणाचा सुमारे एक किमी लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment