पोसरे दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता
पोसरे दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, १ बेपत्ता
खेड : तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाल्याचे रविवारी (२५ जुलै) स्पष्ट झाले आहे तर अद्यापही एकजण बेपत्ता आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथे गुरुवार, दिनांक २२ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सात घरांवर डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत सातजणांना दगड मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तसेच बेपत्ता असलेल्या १७ व्यक्तींचा शोध शुक्रवारपासून सुरू होता. सुरुवातीला स्थानिकांना तीन ग्रामस्थ सापडले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखालून कुणी जिवंत सापडू शकते का, याचा शोध घटनास्थळी दाखल झालेले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घेत होते. मात्र, रविवार, दिनांक २५ पर्यंत बेपत्ता चौदा जणांपैकी बाराजणांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment