शेतकरी राजा हे राज्याचे वैभव- मुख्यमंत्री ठाकरे
कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम गुरूवारी (१ जुलै) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मोहिमेंतर्गत ४० हजार गावांमधील ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. (CM Uddhav Thackeray Guidance Speech to Maharashtra Farmers)
हेही वाचा: मोदींवर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना प्रवीण दरेकरांचा टोला
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
आज कृषी दिन व डॉक्टर दिन आहे. दोघांचेही महत्व आपल्याला या कोविड काळात कळले आहे.
शेतकरी आणि डॉक्टर हे दोघेही अन्नदाते आणि जीवनदाते आहेत
शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत. दुष्काळ, पूर, गारपीट कोरोना अशा संकटांच्या वेळी शेतकरी डगमगला नाही.
शेतकरी राजा हे राज्याचे वैभव आहे
गेले काही काळ निसर्ग बदलतो आहे
सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.

Comments
Post a Comment