परवानगी असलेल्या पालख्यांनाच मिळणार पंढरपुरात प्रवेश !

  



परवानगी नसलेल्या पालख्या, दिंड्या तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालख्या, दिंड्या तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले (Sachin Dhole)) यांनी केले. (Only palanquins allowed on the occasion of Ashadhi Ekadashi will get admission in Pandharpur)

हेही वाचा: जूनमध्ये वाढले साडेअकरा हजार कोरोना रुग्ण !

आषाढी वारी नियोजनाबाबत येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातील सांस्कृतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.धीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

Comments