महामार्गावर जानवलीत हायवे उड्डाणपुलावर अपघात, युवक जागीच ठार
महामार्गावर जानवलीत हायवे उड्डाणपुलावर अपघात, युवक जागीच ठार
कणकवली:-नॅशनल हायवेच्या उड्डाणपुलावर उभ्या ट्रकला मोटरसायकलने मागून दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. रवींद्र रमेश यादव ( वय 37, मूळ रा. कट्टा बाजारपेठ, ता. मालवण ) असे मृत युवकाचे नाव असून तो जाणवलीहून कणकवलीच्या दिशेने येत होता. सापळे शो रूम समोर जाणवली उड्डाणपुलावर आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मयत रवींद्र हा कणकवलीत खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. ब्रेक डाऊन झालेला आयशर टेम्पो नॅशनल हायवेवर जाणवली उड्डाणपुलावर उभा होता. त्या टेम्पोला मोटारसायकलवरून येणाऱ्या रवींद्र याने मागून ठोकर दिली. या अपघातात रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार रवींद्र बाईत, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, वैभव कोळी घटनास्थळी पोचले. मयत रवींद्र चा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment