अत्याचाराचा आरोप होताच केले पीडितेसोबत लग्न, मग दरीत ढकलून केला मर्डर, हत्याकांडाची थरारक कहाणी..!
अत्याचाराचा आरोप होताच केले पीडितेसोबत लग्न, मग दरीत ढकलून केला मर्डर, हत्याकांडाची थरारक कहाणी..!
उत्तराखंड:-सततच्या घरगुती कलहातून एका सेल्समनने आपल्या बायकोला नैनीताल येथील उंच टेकडीवरुन दरीत ढकलून देऊन तिची हत्या केली. नंतर घरी येऊन त्याने आपली बायको पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले.जून महिन्यात घडलेली ही घटना जवळपास महिनाभरानंतर उघडकीस आली असून, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही झाली वरकरणी क्राईम स्टोरी.. पण ती दिसते तितकी साधी सरळ नाही, या हत्येमागे अत्यंत गुंतागुंतीची कहाणी आहे.उत्तराखंडमधील उधमसिंहनगर येथे 24 वर्षीय सेल्समन राहत होता, तर ती 29 वर्षांची..! दिल्लीतील महेंद्र पार्क परिसरात राहत होती. लग्नाचे वचन देत सेल्समन तरुणाने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने साधारण वर्षभरापूर्वी, म्हणजेच 14 जुलै 2020 रोजी दाखल केली होती.तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी त्याला अटक केली. तिहार तुरुंगात त्याची रवानगी झाली. मात्र, नंतर काही दिवसांनी तिनेच पोलिसांत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात अत्याचाराची तक्रार मागे घेत, आपण आरोपीसोबत लग्न करीत असल्याचे तिने नमूद केले होते.दरम्यान, 10 ऑक्टोबरला आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दोघे विवाह बंधनात अडकले. दोघांचे लग्न झाले असले, तरी ते मनाने कधीच एकत्र येऊ शकले नाहीत. किरकोळ कारणांवरुन त्यांच्यात सतत भांडणे होत होती. अशाच एका भांडणाला कंटाळून 7 जून रोजी ती माहेरी निघून गेली.त्यानंतर सेल्समनने 11 जूनला तिला फोन करुन घरी परतण्यास सांगितलं, पण तिच्या आईने मुलीला सासरी पाठविण्यास नकार दिला. तिला सासरी खायला दिलं जात नव्हतं, तिला धमकावलं जात होतं, प्रसंगी मारहाणही करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान, अखेर तो आपल्या बायकोची समजूत काढण्यात यशस्वी झाला. तिला घरी घेऊन गेला. त्यानंतर तिच्या घरच्यांनी 15 जूनला तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.पोलिसांनी तिच्या नवऱ्याला संपर्क केला असता, आपली बायको नैनितालमधून पळून गेल्याचे त्याने सांगितले. तसेच मीही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र तिचा फोन बंद असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.दरम्यान, तिच्या पालकांनी द्वारका कोर्टात अर्ज करीत सेल्समनविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस तपासात दोघांचे शेवटचे लोकेशन नैनितालमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तिथेच तिचा फोन बंद झाला होता. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यावर सत्य समोर आले.आरोपीने सांगितले की, सततच्या भांडणाला वैतागलो होतो. त्यामुळे फिरायला जाण्याच्या बहाण्याने बायकोला नैनिताल येथे आणले. तेथील उंच टेकडीवरुन दरीत ढकलून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरु होते.
--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment