...तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू; जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा इशारा
...तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू; जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा इशारा
रत्नागिरी : जिल्हा परिषदेमधील प्रत्येक अधिकाऱ्याने सदस्याशी सौजन्यपूर्ण वागले पाहीजे. तसेच विकासकामे करताना त्यांना विश्वासात घेतले पाहीजे. दापोली आणि संगमेश्वरमधील शाखा अभियंत्याविरोधातील तक्रारीतून मनमानीपणा पुढे येतो. तसे निदर्शनास आल्यास संबंधीत अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सर्वसाधारण सभेत दिला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शामराव पेजे सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व सभापती आणि सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे संथ झालेला जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुका जाऊन पाचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जाहीर केला. झीरो पेडन्सी, जलजीवन मिशनला चालना देणे, मनरेगा योजनेवर भर, कोरोनातील परिस्थितीचा आढावा आणि थांबलेल्या विकास कामे मार्गी लावण्यासाठी तेथील सदस्यांसह अधिकाऱ्यांना घेऊन आढावा बैठका घेतल्या जाणार असल्याचे श्री. जाधव यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले. कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या कामांचा वेग मंदावला आहे. या परिस्थितीत विकासकामांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने अध्यक्ष जाधव सर्व अधिकाऱ्यांसह प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहेत. प्रलंबित राहीलेल्या कामांची कारणे जाणून घेणार असून जलजीवन मिशन आरखड्यातील कामाला गती देणार आहेत. मनरेगा योजनेतून लोकांना गावातच काम देण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत व्यक्त केले. अधिकारी, कर्मचारी विकासकामाचं नियोजन करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. लोकप्रतिनिधींचाही सन्मान करत नाहीत असे आरोप करत दापोली तालुक्यातील शाखा अभियंता श्री. खाचे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी चारूता कामतेकर यांनी केली. यावर चर्चा झाल्यानंतर त्या अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. तीच परिस्थिती संगमेश्वर तालुक्यातील शाखा अभियंता श्री. घुगे यांची असल्याचा मुद्दा संतोष थेराडे व सभापती जया माने यांनी उपस्थित केला. त्या अधिकाऱ्याला समज देण्यात येईल असे अध्यक्षांनी सुचना दिली. जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याची संतोष थेराडे यांची मागणी मान्य करण्यात आली असून आठवडाभरात ही कारवाई करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. सभागृहात 'डॉक्टर डे'निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचा सत्कार करण्यात आला.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment