राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय - गोपीचंद पडळकर
हेही वाचा: आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक !पवारांवरील टीकेतून घटनेचा संशय
कालच्या घटनेनंतर आज (गुरुवारी) गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कारण, मागच्या वर्षभरामध्ये घडलेल्या घडामोडी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांवर अन्याय करणाऱ्या आहेत आणि त्याच्याविरोधामध्ये मी जाहीरपणे आवाज उठवत आहे. ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. अजित पवारांमुळे पदोन्नत्तीमधील मागास्वर्गीयांचं आरक्षण गेलं. त्यामुळे महाराष्ट्रभर छोट्या छोट्या जात घटकांच्या घोंगडी बैठका घेत आहे. आणि घोंगडी बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी तळातून हललेली आहे. लोक जागे होताहेत ये राष्ट्रवादीला पटत नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली आहे.

Comments
Post a Comment