संगमेश्वर : कांजिवरा दरोड्यामागे खंडणीचे कारण ?
संगमेश्वर : कांजिवरा दरोड्यामागे खंडणीचे कारण ?
देवरूख:-देवरूख कांजिवरा येथे शुक्रवारी पहाटे पडलेला दरोडा हा खंडणीतून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज देवरूखचे पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी वर्तवला आहे. याप्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून लवकरच याचा छडा लावण्यात येईल असे पोलीस निरीक्षक जगताप यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.देवरूख कांजिवरा येथील नुरूल होदा मशहुरअली सिद्दीकी यांच्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडा घातला. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील दरवाज्याची कडी लोखंडी हत्याराने उचकटून दरवाजा उघडून बंगल्यामध्ये प्रवेश केला. सिद्दीकी कुटुंबिय जागे झाले असता त्यांना पिस्तुल व चाकुचा धाक दाखवला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटे स्कु ड्रायव्हरने उघडून सोन्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने ताब्यात घेतल्यानंतर सिध्दीकी कुुंबियांच्या तोंडाला प्लस्टिक टेप गुडांळत व नायलॉन दोरीने हात बांधण्याचा प्रकार घडला. दोन दिवसात पाच कोटी रूपये पाहिजेत नाही तर तुला व तुझ्या मुलाला ठार करू अशी जीवघेणी धमकी चोरट्यांनी दिल्याचे सिद्दीकी यांनी फीर्यादीत नमूद केले आहे. दिलेल्या फीर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी लांज्याचे उपविभागीय अधिकारी राजेश कानडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हेमंतकुमार शहा, देवरूख पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली होती. सायंकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉक्टर मोहिमकुमार गर्ग यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच त्यांनी तपास अधिकाºयांना तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. गुन्हा तत्काळ उघडकीस येण्याच्या दृष्टीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. तपसाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. लवकरात लवकर या घटनेचा छडा लावण्यात येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment