उन्हाळे, राजापुरात सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीने पकडले



उन्हाळे, राजापुरात सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या दोघांना एलसीबीने पकडले 



अवैध विक्रीचे सिंधुदुर्ग कनेक्शन; शिंगांसह 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त


राजापूर:-सिंधुदुर्गातून राजापूर तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे विक्रीसाठी आणलेली सांबराची दोन शिंगे मुद्देमालासह स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून पकडली. यात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन सांबर शिंगे याच्या सह सुमारे १ लाख १९ हजार ५३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवार १६ जुलै रोजी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये अनंत त्रिंबक राणे (५६ ) व संभाजी अशोक पिंगुळकर (४९ ) दोघेही रा. रेडी ता. वेंगुर्ले अशी या दोन संशयीत आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून राजापूर पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याविरूध्द राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वेंगुले येथुन दोन इसम सांबर शिंगाची विक्रीकरण्यासाठी राजापूरात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमांतकुमार शाह यांच्या नेतृत्वाखाली हवालवादर प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, बाळू पालकर, पोलिस नाईक सासवे, सत्यजीत दरेकर, शांताराम झोरे यांनी ही सापळा रचून कारवाई केली. संबधीत संशयीत वाहन उन्हाळे गाडगीळवाडी नजीक आले असता तपासणी केली असता त्यात सांबरशिंग असल्याचे आढळून आली. या सांबर शिंगांची राजापूर वनपाल सदानंद घाटगे यांच्या मार्फत खातरजमा करण्यात आली.यातील आरोपी अनंत राणे व संभाजी पिंगुळकर हे मारूती सुझुकी गाडीने राजापूरकडे येत असताना मुंबई गोवा महामार्गावर कोंढेतड गाडगीळवाडी येथे ही कारवाई केली. या कारवाईत आरोपींकडील सांबर जातीची दोन भरीव शिंगे आढळून आली आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना स्वत:च्या फायदयासाठी व्यापार विक्री करण्याच्या उद्देशाने ही वन्य प्राण्यांची शिंगे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.यावेळी पोलिसांनी संशयीत आरोपींकडून सांबर शिंगासह, सुझुकी कंपनीची चारचाकी मारूती कार, रिअलमी कंपनीचा एक मोबाईल, सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल व रोख रूपये १५३० असा असा सुमारे १ लाख १९ हजार ५३० रूपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. तर त्यांच्याविरोधात वन्य जीव संरक्षण अधि. १९७२ चे कलम ३९,४४,४८,५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक शिल्पा वेंगुलेकर करीत आहेत.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments