करोना लस घेण्यासाठी तरुण-तरुणी दुचाकीवरून निघाले अन्...
करोना लस घेण्यासाठी तरुण-तरुणी दुचाकीवरून निघाले अन्...
पुणे:-कोंढव्यातील 'एनआयबीएम' चौकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून मागून जाणाऱ्या तरुणानेही ब्रेक लावला. त्यात त्याची दुचाकी घसरून, त्यावरील तरुण आणि तरुणी रस्त्यावर पडले. त्या वेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील चारचाकीचे चाक तरुणीच्या पोटावरून गेले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.तीस जूनला ही घटना घडली असून गायत्री गोविंद इथापे (वय १८, मूळ रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश शंकर मांढरे (वय २०, रा. वारजे) याने फिर्याद दिली आहे. गायत्री डॉक्टरकीचे शिक्षण घेत होती, असे प्रथमेशने सांगितले.कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश आणि गायत्री हे दोघे मित्र आहेत. तरुणी एका आयुर्वेदिक वैद्यकीय महविद्यालयात शिक्षण घेत होती; तर प्रथमेशचे इंजिनीअरिंगचे शिक्षण सुरू आहे. ते दोघे २९ जूनला दुपारी पावणेदोनच्या सुमारास मोपेडवरून उंड्री परिसरात गेले होते. तिथून ते मुंढव्याला चालले होते. प्रथमेश गाडी चालवित होता. त्या वेळी एनआयबीएम चौकाच्या अलीकडे समोरील रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे प्रथमेशनेही अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरून ते दोघेही रस्त्यावर पडले. गायत्री दूर फेकली गेली. त्याचवेळी एनआयबीएम चौकातून उंड्रीच्या दिशेला भरधाव वेगात चाललेल्या चारचाकीचे चाक गायत्रीच्या पोटावरून गेले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
... पण अपघाती मृत्यू आला
करोनापासून बचावासाठी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथमेश आणि गायत्री दोघेही मुंढव्याला करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी चालले होते. मात्र, वाटेतच गंभीर अपघात झाल्याने गायत्रीला प्राण गमवावे लागले. त्यामुळे मित्र परिवार आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment