लांजा येथे दुकानातून गेला १,३७,५०० रुपयांचा ऐवज चोरीला




लांजा येथे दुकानातून गेला १,३७,५०० रुपयांचा ऐवज चोरीला


 लांजा : शहरातील झमझम बँगलमार्ट येथे खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे १,१५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व २२,५०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ. प्रज्ञा शशिकांत साठे वय ३७, रा. चिपळूण या १६ जुलै २०२१ रोजी झमझम बँगलमार्ट या दुकानात साहित्य खरेदीसाठी गेल्या होत्या. दुकानदाराला पैसे देण्याकरिता गेल्या असता यांनी मंगळसूत्र व रोख रक्कम असणारी पिशवी दुकानातील स्टूलवर ठेवली. याचदरम्यान हि पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत लांजा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments