साताऱ्यात अतिवृष्टीमुळं दरड कोसळली; अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली
साताऱ्यात अतिवृष्टीमुळं दरड कोसळली; अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली
मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम असलेल्या संगम माहुली येथे पूर आला आहे. साताऱ्यात माळीणची पुनरावृत्ती टळली आहे.
साताराः सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. बुधवारी संध्याकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला आहे. तर देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती.राज्यात बुधवारपासून पावसानं रौद्ररुप धारण केलं आहे. मुसळधार पावसामुळं सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या दुर्घटनेत अनेक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचाव पथकानं तातडीने धाव घेत २७ जणांना बाहेर काढलं आहे. मात्र, एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येतेय.मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं व त्यामुळं डोंगर तुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत २७ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत २० ते २५ जनावरे दगावल्याची माहिती आहे.सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळून सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर डोंगर कोसळला. यात सात ते आठ घरं गाडली गेल्याची माहिती आहे. तर पंधरा ते वीस घर घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे गावात हाहाकार उडाला.दरम्यान, मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा शहरालगतच्या संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमस्थळी पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने माहुलीतील श्री काशिविश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्या आणि लगतची कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. या स्मशानभूमीत करोनारुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पर्यायी व्यवस्था कोठे करायची, असा प्रश्न नगरपालिका प्रशासनाला पडला आहे. महाबळेश्वर तालुक्यात तर या पावसाने हाहाकार उडाला असून महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या चतुरबेट या गावाला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने बारा गावांचा संपर्क तुटला आहे.
.................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment