दापोलीत खड्डे बुजवण्याचे काम करताना किरकोळ कारणावरून मारहाण
दापोलीत खड्डे बुजवण्याचे काम करताना किरकोळ कारणावरून मारहाण
दापोली : दापोली युवा सेना शहर प्रमुख स्वप्निल पारकर यांना क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना दापोली कोकंबा आळी येथे घडली. स्वप्निल पारकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दापोली शहरांमध्ये पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे सामाजिक कार्य मरिआई मित्र मंडळ यांच्याकडून सुरू होते. कोकंबा आळीमधील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना केदार परांजपे, सुयोग घाग, सुमेध कदम असे सर्वजण काम करीत होते. मरिआई मंदिरासमोर काम सुरू असताना सुचित मेहता हा मोटारसायकल घेऊन वेगाने निघून गेला व जाताना गाडीमुळे चिखलाचे पाणी काम करणाऱ्यांच्या अंगावर उडाले. त्यावेळेला तू एवढ्या वेगाने का जातोस अशी विचारणा करण्यात आली. थोड्यावेळाने सूचित मेहता हातात दगड घेऊन "तुमची दररोजची नाटकं असतात. हे खड्डे काय आता भरण्याची वेळ आहे का?" असे म्हणाला. त्यावेळेला काम करीत असणाऱ्या सर्वांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन त्याने हातातील दगड स्वप्निल पारकर याच्या डोळ्यावरील बाजूस मारला. यात स्वप्निल याना गंभीर दुखापत झाली. यावेळी केदार परांजपे, सुयोग घाग, सुमेध कदम सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. स्वप्निल पारकर याना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी दापोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment