जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत





जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत


 रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतमध्ये ज्या नागरिकांजवळ व्हॉटस् अॅप अथवा ई-मेल सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करणारे नागरिक आणि ही सुविधा जर दोन्ही पक्षकारांकडे उपलब्ध असेल, तर त्यांना लोकअदालतमध्ये ऑनलाईन सहभागी होता येईल. लोकअदालतच्या ऑनलाईन सूचना, पूर्वबैठका याचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे केले जात आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकार यांनी आपले व्हॉटसअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडी संबंधित न्यायालय, बँका, पतसंस्था, शासकीय कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपलब्ध करुन द्याव्यात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोयीचे होईल. ज्या प्रकरणांमध्ये ऑनलाईन सहभाग घेता येणार नाही अशा लोकांना विधी सेवा प्राधिकरण आणि संबंधित न्यायालय यांच्यामार्फत नोटिसा देण्यात येणार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जलद निकाल घेण्यासाठी सहभागी व्हायचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांच्या संदर्भात जलद न्याय घेण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सहभागी होऊन वाद निवारण करावे, असे आवाहन सचिव/न्यायाधीश रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.



..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments