लायन्स क्लब रत्नागिरी चा नवीन कार्यकारणी शपथग्रहण समारंभ उत्साहात साजरा
लायन्स क्लब रत्नागिरी चा नवीन कार्यकारणी शपथग्रहण समारंभ उत्साहात साजरा
रत्नागिरी : लायन्स इंटरनॅशनल संस्था जगभरात 210 देशात कार्यरत असलेली 104 वर्षाची संस्था.. ह्या संस्थेचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक क्लब कार्यकारणीचा कार्यकाल फक्त एक वर्षाचा असतो ह्या नियमाला अनुसरून लायन्स क्लब रत्नागिरीच्या नूतन कार्यकारणीचा शपथ ग्रहण समारंभ लायन्सआय हॉस्पिटलच्या सभागृहात सर्व शासकीय परवानगी सह 25 सभासदांच्या उपस्थित मध्ये सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाला. ह्यावेळी मावळत्या अध्यक्षा लायन श्रेया केळकर, सचिव मनाली राणे, खजिनदार डॉ शिवानी पानवलकर ह्यांनी आपल्या वैभवशाली कार्यकालाचा आढावा घेऊन क्लब मधील अनेक सभासदांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. ह्या कार्यक्रमाला वर्चुअल प्लॅटफॉर्म वर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीश मालपाणी ह्यांनी सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले, ह्या शपथ विधी कार्यक्रमासाठी लायन्स क्लब मालवण येथील माजी रिजन चेअरमन ला गणेश प्रभुलकर ह्यांनी नूतन कार्यकारणी ला शपथ दिली ह्यामध्ये वर्ष 21-22 वर्षाकरिता रत्नागिरीतील प्रतिथयश ऍडव्होकेट ला शबाना वस्ता ह्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली तर सचिव म्हणून लायन अभिजित गोडबोले आणि खजिनदार म्हणून मंगला हॉटेल चे सर्वेसर्वा लायन गणेश धुरी ह्यांनी शपथ घेतली.सोबत नूतन अध्यक्ष ला शबाना वस्ता सह त्यांच्या कार्यकारणी मध्ये सहसचिव ला अस्लम वस्ता,टेमर ला डॉ शिवानी पानवलकर, टेल ट्विस्टर ला श्रद्धा कुळकर्णी,पीआओ ला आहाना गोडबोले,GAT चेअरमन ला श्रीपाद केळकर,GLT चेअरमन ला दत्तप्रसाद केळुस्कर, GMT चेअरमन ला डॉ शेखर कोवळे,GST चेअरमन ला पराग पानवलकर,क्लब अडमिनीस्ट्रेटर ला श्रेया केळकर,LCIF चेअरमन MJFला सुनीलदत्त देसाई,बुलेटिन संपादक आणि मार्केटिंग अँड कॉमुनिकेशन चेअरमन ला दत्तप्रसाद कुळकर्णी,आयटी चेअरमन ला दीप्ती फडके,लायन क्वेस्ट चेअरमन ला शिल्पा पानवलकर ह्यांना ही शपथ देण्यात आली, ह्या कार्यकारणी मध्ये सल्लागार म्हणून जेष्ठ ला डॉ MJF रमेश जी चव्हाण, ला सुधीर उर्फ आप्पा वणजु, MJFला दीपक साळवी, ला प्रमोद खेडेकर,MJF लायन डॉ संतोष बेडेकर,ला यश राणे, ला डॉ शैलेंद्र भोळे, ला ओंकार फडके, ला सुप्रिया बेडेकर, ला क्षिप्रा कोवळे काम पहाणार आहेत, सर्वांचा शपथग्रहण समारंभ संपन्न झाल्यावर मावळत्या अध्यक्षा ला श्रेया केळकर ह्यांनी सर्व सूत्रे नूतन अध्यक्ष ला ऍड शबाना वस्ता ह्यांच्याकडे सोपवली, अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच नूतन अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष ह्यांनी आपापली मनोगते व्यक्त करून लायन्स क्लब रत्नागिरीला विविध सेवाकार्य करून उतुंग शिखरावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला ह्यानंतर ला गणेश प्रभुलकर ह्यांनी नवीन कार्यकरणीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या, त्याच प्रमाणे लायन्स ट्रस्ट अध्यक्ष ला संतोष बेडेकर, माजी झोन चेअरमन ला गुलाम पारीख, नूतन झोन चेअरमन ला प्रमोद खेडेकर ह्यांनीही नूतन कार्यकारणी ला शुभेच्छा दिल्या.नूतन रिजन चेअरमन ला संजू पटेल ह्यांनी ही संदेश पाठवून प्रांतपाल वतीने शुभेच्छा दिल्या ह्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि शेवटी सचिव ला अभिजित गोडबोले ह्यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीत झाले आणि शेवटी स्वादिष्ट भोजनानंतर ह्या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment