महागाईचा भडका, पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?




 महागाईचा भडका, पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?


 महाराष्ट्र:-सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई हे सर्वात मोठे आव्हान(challenge) ठरत आहे. खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आज (शनिवार 17 जुलै) तेल कंपन्यांकडून पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढ होत आहे.आज देशातील चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटरने वाढ झाली आहे. तर राजधानी दिल्लीत आज प्रतिलिटर पेट्रोलची किंमत वाढून 101.84 रुपये झाली आहे. तसेचे डिझेलची किंमत मात्र अद्याप प्रतिलिटर 97.45 रुपये आहे.


देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.

जुलै महिन्यात नव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

दरम्यान यामुळे जुलै महिन्यात सलग नऊ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती या 5 वेळा वाढल्या आहेत. तर एकदा त्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.


शहर पेट्रोल (रुपये/लिटर) डिझेल (रुपये/लिटर)

नवी दिल्‍ली 101.84 89.87

मुंबई 107.83 97.45

कोलकाता 102.08 93.02

चेन्‍नई 102.49 94.39

नोएडा 99.02 90.34

बंगळूरु 105.25 95.26

हैदराबाद 105.83 97.96

पाटणा 104.25 95.51

जयपूर 108.71 99.02

लखनऊ 98.92 90.26

गुरुग्राम 99.46 90.47

चंडीगढ़ 97.93 89.50

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.


पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments