निवळी येथून नोकराने लांबविले ८५ हजार रुपये




 निवळी येथून नोकराने लांबविले ८५ हजार रुपये


रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील घरातून रोख ८५ हजार रुपये नोकराने लांबवल्याची घटना सोमवार ५ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वा. कालावधीत घडली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत चाकवे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नोकराचे नाव आहे. त्याच्या विरोधात रंजना चंद्रकांत वाडकर (५५, रा. निवळी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी अनिकेत चाकवे नावाच्या तरुणाला घरकामासाठी ठेवले होते. दरम्यान, ५ जुलै रोजी रंजना वाडकर काही कामानिमित्त रत्नागिरीत आल्या असता अनिकेतने घरातील रोख रक्कम घेऊन पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org