पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल असा मला विश्वास : उपमुख्यमंत्री अजित पवार
पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल असा मला विश्वास : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना 'आषाढी एकादशी'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे! बळीराजा सुखी होऊ दे! शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे! बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव'. महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंग भक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींना वंदन करतो. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंग भक्तीची, पंढरपूर वारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा मला विश्वास आहे', या आशयाची पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा