चिपळूण पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी खालगाव जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा मोठा हातभार,सव्वालाखातून जीवनावश्यक ९० किटची मदत
चिपळूण पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी खालगाव जाकादेवी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा मोठा हातभार,सव्वालाखातून जीवनावश्यक ९० किटची मदत
जाकादेवी:- रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी बाजार पेठेतील व्यापार्यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा निधी उभारून त्या निधीतून जीवनावश्यक वस्तू पुरवून या पूरग्रस्त नागरिकांना फार मोठा दिलासा देण्याचा स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम या व्यापाऱ्यांनी पार पाडला.उल्लेखनीय बाब म्हणजे जाकादेवी व्यापारीवर्गातर्फे अवघ्या ६ तासात या मदतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जाकादेवी येथील सर्व व्यापाऱ्यांतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होताच अनेकांचे हात पुढे आले.या मदतीसाठी सर्व राजस्थानी बंधूंनी एकत्र येऊन सुमारे पंचवीस हजार रुपये जमा केले. सदरचा मदत निधी उभारण्यासाठी जाकादेवी बाजारपेठेतील अनेकांचे हातभार लागले.यामध्ये रुपेश देसाई, अमित कोळवणकर, मिलिंद शितूत, कैलास खेडेकर, सचिन मुळ्ये, सुधाकर सावंत, प्रसन्न खेडेकर, अतिन खेडेकर, गौरव खेडेकर, राजू देसाई, सुहास देसाई, बापू केदार, दिनेश देसाई, उमेश देसाई, मयुरेश देसाई, संभाजी गोताड, संदीप भांडे, बंटी सुर्वे, उदय शितूत, दीपक शितूत, संजय मुळ्ये, विनोद काळे, जस्मिन किराणा, महेश देसाई, प्रकाश घाणेकर, अरुण गोताड, शैलेश ढवळे, सागर गोताड, अनंत गोणबरे, राकेश रहाटे, जोशी पान शॉप, सचिन संसारे, दीपक मुंडेकर, वैभव गोताड, दादा गवळी, सुशांत शिवगण, प्रशांत सावंत, गोट्या गुरव, संदेश शिंदे, संकेत पवार, अमोल पवार, राजेश गोरे, किरण सनगर, नानु पवार या सर्वांनी सेवाभावी वृत्तीने उत्स्फूर्त सहकार्य केले. याकामी प्रतिक देसाई, राकेश खेऊर, रोहित मयेकर, राहुल शिंदे आणि स्वराज पवार या सर्वांनीही मोलाचे योगदान दिले. यावेळी सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे, पाण्याच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. या वस्तूंच्या वितरणासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी अक्षय कारंडे, धनंजय भालेकर, कल्पेश सुतार आणि पेठमाप येथील स्थानिक रहिवासी महेश चंद्रकांत शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.खालगाव जाकादेवी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या दातृत्वाविषयी अनेक स्तरांतून समाधान व्यक्त केले.
..................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment