चिपळूण शहराच्या सफाई साठी पाठवलेले हाई फ्लो सुपर सुकर मशनरी दाखल....
चिपळूण शहराच्या सफाई साठी पाठवलेले हाई फ्लो सुपर सुकर मशनरी दाखल....
शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांच्या मागणीनुसार शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना एकनाथजी शिंदे ह्यांनी चिपळूण शहराच्य सफाईसाठीपाठवलेले हाई फ्लो सुपर सुकर मशनरी दाखल....
चिपळूण शहराला अतिवृष्टी मुळे आलेल्या पुरा मध्ये अतोनात नुकसान झाले असून आता पूर हळूहळू ओसरल्या नंतर आता मोठया प्रमाणात शहरामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून तो साफ करणे मोठ्या कष्टाचे झाले आहे. हे मागील पाच दिवस चिपळूण तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांच्या लक्षात येताच काल चिपळूण पूरपरिस्थिती ची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना एकनाथजी शिंदे ह्यांच्याकडे मुंबई व ठाणे महानगरपालिके कडे असलेल्या हाई फ्लो सुपर सुकर मशनरी चिखल साफ सफाई करण्यासाठी पाठवण्याची मागणी केली होती त्यानुसार आज ताबडतोब शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांच्या मागणीनुसार शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना एकनाथजी शिंदे ह्यांनी मुंबई व ठाणे महानगरपालिका चे आयुक्त, उपआयुक्त व डॉक्टर्स अन्य कर्मचारी अशी २०० जणांच्या टीम सह ५ हाई फ्लो सुपर सुकर मशनरी पाठवल्या असून त्या आता चिपळूण शहरा मध्ये दाखल झाल्या असून उद्या सकाळ पासून शहरातील साफ सफाई साठी सुरुवात करण्यात येणार असल्यामुळे आता चिपळूण शहरा तील साफ सफाई ला वेग येणार आहे.हाई फ्लो सुपर सुकर मशनरी शहरात दाखल होताच शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांच्या सह राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी व कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार वैभवजी नाईक ह्यांनी आलेल्या टीम ला शहरातील परिस्थिती ची माहिती देऊन उद्या पासून सुरू होणाऱ्या कामाचे नियोजन करून दिले. त्याप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उद्योजक किरणशेठ सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालूकाप्रमुख प्रताप शिंदे, संदीप सावंत, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राजू देवळेकर, नगराध्यक्षा सूरेखा खेराडे, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment