रत्नागिरीतील बुजुर्ग व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजींचे निधन
रत्नागिरीतील बुजुर्ग व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजींचे निधन
रत्नागिरी :-रत्नागिरीतील बुजुर्ग व्यक्तिमत्त्व 106 वर्षीय महादेव नारायण वांदरकर तथा वांदरकर गुरुजी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले . स्वातंत्र्य चळवळीचे ते साक्षीदार होते. चार दिवसांपूर्वी त्याचा 106 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता . 15 जुलै 1916 साली त्यांचा जन्म झाला होता. 1935 साली ते सातवी पास झाले. ब्रिटिशांचा कारभार त्यांनी पहिला होता तर ते महात्मा गांधीजी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते तर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यान पदयात्रेत त्यानी सहभाग घेतला होता . 1931 मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष देखील त्यांनी पाहिला होता . गाडगेबाबा यांच्या सोबत स्वच्छता मोहिमेत वांदरकर गुरुजी सहभागी झाले होते. स्वा. वि. दा. सावरकर यांचे अनुयायी असणाऱ्या वांदरकर गुरुजी हे मिऱ्या गावचे. त्यांच्यावर एक शॉर्ट फिल्मही साकारण्यात येत होती. त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर आहेत. गुरुजी दिसले की ते वाकून नमस्कार करत. तसेच नियमित व्यायाम, सकस आहार यामुळे १०६ वर्षे निरोगी जीवन जगले.रत्नागिरीतील बुजुर्ग व्यक्तिमत्वाच्या निधनाने रत्नागिरी हळहळली.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment