राज्यात दूधाचे दर वाढणार…




 राज्यात दूधाचे दर वाढणार…


अमूल डेअरी आणि मदर्स डेअरी पाठोपाठ आता गोकुळनेही दूधाच्या दरात (milk price) दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता दूधाचे दर वाढणे क्रमप्राप्त आहे. गोकुळच्या (Gokul) या निर्णयानंतर राज्यातील इतर दुग्ध उत्पादक संघही दरवाढ करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दूधासाठी जादा पैसे मोजावे लागतील.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शनिवारी गोकुळ दूधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतील. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नाही.सध्या गायीच्या एक लीटर दुधासाठी (milk price)  47 रुपये मोजावे लागत आहेत. ही किंमत आता 49 रुपये इतकी होईल. तर म्हशीच्या दूधाची किंमती प्रतिलीटर 58 रुपयांवरुन 60 रुपये इतकी झाली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाकडून राज्यभरात दररोज 12 लाख लीटर दूधाची खरेदी केली जाते.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org